breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

रेमडेसिवीर इंजेक्शनचा मेडिकलमध्ये काळाबाजार, अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांनी टाकली धाड

मुंबई | कोरोनावर प्रभावी औषध ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा तक्रारी गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आज भायखळा येथील काही मेडिकल दुकानांवर धाड टाकली.

या धाडीविषयी माहिती देताना राजेंद्र शिंगणे म्हणाले की, “रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबजार होत असल्याच्या तक्रारी गेल्या दोन दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशासनाकडे येत होत्या. काही वृत्तपत्रांमध्येही तक्रारी छापून आल्या होत्या. तर काहींनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयात प्रत्यक्ष फोन करुन तक्रारी केल्या. त्याअनुषंगाने कालपासूनच मुंबई महापालिकेत, रुग्णालयांमध्ये आणि बाजारात हे औषध किती उपलब्ध आहे, याचा आढावा घेतला जात आहे.’

“रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार मेडिकल दुकानदारांनी रुग्णाचं आधारकार्ड, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आणि फोन नंबर या सर्व गोष्टींची नोंद करुन औषध देणं जरुरीचं आहे. या नियमावलीनुसार मेडिकलचे मालक औषधांची विक्री करतात का, ते तपासलं जात आहे”, असं मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले की, “आज सकाळपासून मुंबईतील विविध मेडिकलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा स्टॉक किती आहे. त्यांनी किती रुपयांना इंजेक्शन खरेदी केले. याबाबत माहिती घेतली जात आहे.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button