breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

रेमंड्स कंपनीच्या कार्यालयाला आग; लाखोंचे नुकसान

ठाणे – ठाणे शहरातील वर्तक नगर येथे असलेल्या सर्वात मोठ्या रेमंड्स कंपनीच्या कार्यालयाला आज पहाटे भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4-5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. काही तासांतच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

ठाण्यातील वर्तक नगर परिसरात रेमंड्स कंपनीचे एक मजली कार्यालय आहे. या कार्यालयाला आज पहाटे साडे पाचच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या, 5 पाण्याचे टँकर आणि पोलीस दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. काही तासांतच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीमुळे कार्यालयात असलेले सर्व सामान जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button