breaking-newsमनोरंजन

“रिऍलिटी शो’ चा जज बनण्याची इच्छा नाही : इम्रान हाश्‍मी

इम्रान हाश्‍मी सध्या “चीट इंडिया’ या आपल्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा आगोदर 26 जानेवारीच्या मुहुर्तावर रिलीज होण्याचे निश्‍चित झाले होते. मात्र याच दिवशी “ठाकरे’ आणि “मणिकर्णिका’ही रिलीज होणार असे समजल्यामुळे “चीट इंडिया’ एक आठवडा आगोदर म्हणजे 18 जानेवारीला रिलीज केला जाणार आहे. या निर्णयामागे सिनेमातील स्पर्धा कमीत कमी करण्याचे कारण गृहित धरले आहे, असे इम्रानने सांगितले. सध्या फॅन्समधील ट्रेन्ड सारखे बदलत राहिले आहेत. त्यामुळे सिनेमांचे विषयही वारंवार बदलायला लागले आहेत.

अन्य कलाकारांप्रमाणे टिव्हीवरील “रिऍलिटी शो’मध्ये जज म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर आपल्याला त्यामध्ये अजिबात इंटरेस्ट असणार नाही, असेही इम्रानने स्पष्ट केले. आपल्याला अशा काही “रिऍलिटी शो’चे जज बनण्याच्या ऑफर्सही मिळाल्या होत्या. मात्र त्याने त्या नाकारल्या. “रिऍलिटी शो’च्या जज बनण्यामध्ये काही वाईट आहे, असे अजिबात आपल्याला म्हणायचे नाही. मात्र आपल्याला काही वेगळ्या कॉन्सेप्टमध्ये काम करायचे असल्यामुळेच आपण असा निर्णय घेतल्याचेही त्याने सांगितले. “चीट इंडिया’मध्ये देशातील पोकळ शिक्षण व्यवस्थेचे चित्र मांडले गेले असून त्यामध्ये इम्रान एक निगेटिव्ह रोल साकारणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button