breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रिंग रोड बाधितांच्या घरावर नांगर फिरविण्याचे काम आमदार करत आहेत – दत्ता साने

  • रिंग रोडला न्यायालयाची स्थगिती
  • निविदा प्रक्रिया त्वरीत मागे घ्यावी
  • बाधितांची प्रशासनाकडे मागणी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – रिंग रोड बाधितांच्या रेट्यामुळे उच्च न्यायालयाने या रस्त्याच्या कामाला स्थगिती दिली आहे. तरी, महापालिकेतील सत्ताधारी भाजप नेत्यांना रस्त्याचे काम कधी एकदा सुरू करेण, याची घाई झाली आहे. या कामाची 28 कोटींची निविदा काढण्यात आल्याने संतापग्रस्त रिंग रोड बाधित पुन्हा एकवटले आहेत. प्रशासकीय निविदा प्रक्रिया थांबविण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना साकडे घातले आहेत. यावर बोलताना आमदार जगताप स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी लोकांच्या घरावर नांगर फिरवायला निघाले आहेत, अशी टिका साने यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण प्रशासनाकडून होणा-या रिंग रोडमध्ये वाल्हेकरवाडी, थेरगाव, काळेवाडी-रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळ गुरव, कासारवाडी भागातील नागरिकांची घरे बाधित आहेत. रस्त्याची 100 टक्के जागा ताब्यात आलेली नसताना प्राधिकरणाने काळेवाडी, थेरगाव भागातील घरे पाडण्यास सुरूवात केली होती. या कारवाईच्या विरोधात घर बचाव संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी या रस्त्याला न्यायालयातून स्थगिती आणली. तरी, पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक ते काळेवाडी फाटा दरम्यान प्रस्तावित रिंग रोडचे काम करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिका-यांनी 28 कोटींची निविदा प्रक्रिया राबविली. न्यायालयाची स्थगिती असताना पालिका प्रशासन अडमुठेपणाणे हा रस्ता करण्याची घाई करत आहे, असा आरोप बाधितांनी केला आहे.

प्रशासनाने निविदा थांबवावी यासाठी घर बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि रहिवाशी आज आयुक्त श्रावण हार्डीकर यांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी महापालिकेत आले होते. आयुक्त आज पालिकेत नसल्यामुळे त्यांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्याकडे याबाबत दाद मागितली आहे. त्यावर सह शहर अभियंता राजन पाटील यांना केबिनमध्ये बोलाऊन साने यांनी रिंग रोडच्या कामाची माहिती विचारली. त्यावर पूर्ण जागा ताब्यात नसताना निविदा प्रक्रिया राबविण्याचे कारण काय, असा प्रश्न करत न्यायालयाची स्थगिती उठेपर्यंत हे काम सुरू करू नये, अशी मागणी रहिवाशांनी केली.

यावर विरोधी पक्षनेते साने म्हणाले की, आमदार लक्ष्मण जगताप स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अधिका-यांवर प्रेशर वाढवून रिंग रोडचे काम करण्यासाठी त्यांना भाग पाडत आहे. म्हणून तर न्यायालयाची स्थगिती असताना अधिका-यांनी कोकणे चौक ते काळेवाडी फाटा रिंग रोडच्या कामाची निविदा प्रक्रिया राबविली. लोकांच्या घरांवर नांगर फिरविण्याचे काम आमदार जगताप करत आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया राबविणे म्हणजे न्यायालयाचा अवमान केल्यासारखेच आहे, असेही साने यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button