breaking-newsमुंबई

ट्रेन समोर उडी मारणाऱ्या आईला वाचवताना मुलगीही लोकलच्या धडकेत जखमी

भरधाव ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या करणाऱ्या आईला वाचवताना मुलगी सुद्धा जखमी झाली आहे. आईला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघा मायलेकींना ट्रेनची धडक बसली. जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी संध्याकाळी ही दुर्देवी घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

३८ वर्षीय सुनिता विधाळे या महिलेने धावत्या ट्रेन समोर उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आपल्या आईला वाचवताना १६ वर्षांची मुलगी सुद्धा जखमी झाली. सुनिता विधाळे यांची प्रकृती गंभीर असून मुलीची प्रकृती सुधारत आहे. ४.३९ च्या सुमारास चर्चगेटला जाणारी फास्ट लोकल जोगेश्वरी स्थानकाच्या दिशेने आल्यानंतर दोन महिला या ट्रेनच्या दिशेने धावताना या व्हिडिओमध्ये दिसतात.

त्यामध्ये एक महिला दुसऱ्या महिलेला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असताना दोघींना ट्रेनची धडक बसली. गोरेगाव येथे रहाणाऱ्या ३८ वर्षीय सुनिता यांचा प्रकृती गंभीर असून त्यांना कुपर हॉस्पिटलमधील आयसीयू कक्षात ठेवण्यात आले आहे. हा सरळ सरळ आत्महत्येचा प्रयत्न आहे असे रेल्वेचे म्हणणे आहे पण कुटुंबाने ही आत्महत्या नसल्याचे म्हटले आहे. त्या दोघी रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना ट्रेनची धडक बसली असे कुटुंबाचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button