breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

  • नोकरी देण्याचं आमिष दाखवून केला बलात्कार

औरंगाबाद – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद शहरातील बायजीपुरा राहणाऱ्या खाजगी शिकवणी घेणार्‍या २९ वर्षीय तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

१४ नोव्हेंबर रोजी मुंबईला जाण्याचे कारण सांगत त्या तरुणीला जालना रोडवरील हॉटेल रामगिरी समोर बोलावले. रात्री नऊच्या सुमारास रामगिरी हॉटेल समोर पोहोचले असता मेहबूब कार घेऊन त्या ठिकाणी उभे होते. तरुणी मागील सीटवर बसली असता त्यांनी वसंतराव नाईक कॉलेज जवळ निर्मनुष्य ठिकाणी थांबून तर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याविषयी आम्ही मेहबूब इब्राहिम शेख जे राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना विचारणा केली असता ते स्वतः म्हणतात की शिरूर तालुक्यात दुसरा कोणीही मेहबूब इब्राहिम शेख नावाचा व्यक्ती नाही .कोणी असेल तर पोलिसांना शोधावं. पण सदरील महिलेला मी कधीही भेटलो नाही, दहा अकरा तारखेला मी मुंबईत होतो. तर १७ तारखेला मी माझ्या मूळ गावी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

औरंगाबाद शहरातील तरुणीचे बीएडपर्यंत शिक्षण झाले आहे. ती घरगुती शिकवणी घेते. त्या तरुणीला औरंगाबाद शहरातील बायपास परिसरात शिकवणी सुरू करायची असल्याने ती बायपास परिसरात खोली भाड्याने घेण्यासाठी गेली असता. त्याठिकाणी तिची बीड जिल्ह्यातील शिरूर कासारमधील महबूब इब्राहिम शेख यांच्याशी भेट झाली.

त्यांनंतर तिचे शिक्षण किती झाले विचारून तुला मुंबईत नोकरी लावून देतो असे आमिष महेबूब शेख यांनी दाखवले. याबाबत कुठे वाच्यता केली तर तुला सोडणार नाही’ असे म्हणून तिला कारमधून उतरून दिले. घटनेनंतर तरुणीच्या मावशीने धीर दिल्यानंतर सिडको पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार केली. याप्रकरणी औरंगाबाद शहरातील सिडको पोलीस ठाण्यांमध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button