पुणे

पुण्यात तेलंगणा पोलिसांची कारवाई, ऑनलाइन कर्ज देऊन फसवणूक

तेलंगणा पोलिसांनी पुण्यात मोठी कारवाई केली आहे. ऑनलाइन कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा तेलंगणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुणे पोलिसांच्या मदतीने पुण्यात सुरू असणाऱ्या एका कॉल सेंटरवर छापा टाकला. शनिवारी सायंकाळच्या सुमारास केलेल्या कारवाईत पोलिसांनी एका चिनी महिलेसह तिघांना अटक केली आहे.

या कारवाई दरम्यान पोलिसांनी 100 हून अधिक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केले आहेत. तसेच अनेक कागदपत्रासह बँक खात्यात लाखो रुपये आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हैदराबाद आणि तेलंगणा परिसरात ऑनलाइन लोन देणाऱ्या कंपन्या पोलिसांच्या रडारवर आहेत. ऑनलाइन लोन देण्यासंदर्भातील प्रक्रिया पुण्यातील एका कॉल सेंटरमधून सुरू असल्याची माहिती तेलंगणा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तेलंगणा पोलिसांनी पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिसांची मदत घेत शनिवारी या कॉल सेंटरवर छापा टाकला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button