TOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात घट
नवी दिल्ली | प्रतिनिधी
ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात आज तोळ्यामागे 335 रुपयांची तर चांदीत किलोमागे 167 रुपयांची घट झाली. त्यामुळे सोन्याचा दर 48 हजारांच्या जवळ आला. चांदी 61 हजाराच्या खाली आली होती. बुलियन बाजारात सोमवारी सोन्याचा दर 48 हजार 527 रुपयांवर बंद झाला होता. मात्र आज सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या दरात 335 रुपयांची घट झाल्याने तो 48 हजार 192 रुपयांवर खुला झाला. चांदीच्या दरातही किलोमागे 167 रुपयांची घट झाली. त्यामुळे चांदीचा दर 60 हजार 939 रुपये होता. ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीचे दर कोसळल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.