breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रराजकारण

राष्ट्रवादीच्या आमदाराचं जात प्रमाणपत्र बोगस; शिवसेनेचा गंभीर आरोप

पुणे |महाईन्यूज|

मोहोळ विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार यशवंत माने यांच्याकडे दोन जातीचे दाखले आहेत. धक्कादायक म्हणजे त्यांनी बोगस जातीचा दाखला काढून शासनाची फसवणूक केली असल्याचा आरोप शिवसेना नेते नागनाथ क्षीरसागर यांचे पुत्र सोमेश क्षीरसागर यांनी केला आहे. सोमेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांचे दोन्ही दाखले सादर केले.

बुलडाणा जिल्ह्यात कैकाडी समाज हा SC मध्ये गणला जातो. त्यानुसार यशवंत माने यांच्याकडे SC चे जात प्रमाणपत्र आहे. तर पुणे जिल्ह्यात कैकाडी समाज हा VJ विमुक्त वर्गात येतो. त्यामुळे आमदार माने हे मागील 100 वर्षांपासून इंदापूर तालुक्यात राहत असून त्यांनी बुलडाण्यातून SC वर्गाचा जातीचा दाखला दाखल करुन निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे.

आमदार यशवंत माने यांचा कैकाडी समाजाचा इंदापूरमधील शेळगावचा दाखला हा VJ विमुक्त वर्गातील असून 1985 साली त्यांनी हा दाखला काढला होता. बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीमधून त्यांनी SC चा दाखला काढून त्यावर मोहोळ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढवल्याचा दावा तक्रारदार सोमेश क्षीरसागर यांनी यावेळी केला. याबाबत बुलडाणा जातपडताळणी कार्यालयाकडे याबाबत तक्रार दाखल केली असून मोहोळ पोलिस स्टेशनमध्ये देखील फिर्याद दिल्याचा दावा सोमेश क्षीरसागर यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button