breaking-newsपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काटे बनले ‘अन्नदाता’, पिंपळे सौदागर मधील मजुरांना केले अन्नदान

– पक्षाचे नेते अजित पवारांची सूचना येताच उतरले मैदानात

– भूकेने व्याकूळ झालेल्या गोरगरिबांना सापडला आशेचा किरण

पिंपरी | महाईन्यूज| प्रतिनिधी

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी रोजंदारी, मोलमजूरी व दैनंदीन काम करणा-या कष्टक-यांना मदत पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मदतीसाठी आवाहन केले होते. त्यावर पिंपळे सौदागर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते संदीप काटे यांनी तातडीने कार्यकर्त्यांची फौज तयार करून प्रभागातील मजूर, कामगार व गोरगरीब अशा भुकेने व्याकूळ झालेल्या जनतेला अन्नपुरवठा केला.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, दररोज कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यातच आता लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविण्यात आल्यामुळे शहरातील गोरगरीब, हातावर पोट असणारे मजूर, कामगार हातघाईला आले आहेत. त्यांना दोन वेळचे जेवण मिळणे देखील दुरापास्त झाले आहे.  या अनुषंगाने कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते धावून येत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी पक्षनेत्यांच्या आदेशाचे पालन करीत, पुढे येत परिसरातील गोरगरीब, हातावर पोट असणारे मजूर व कामगारांना अन्नाच्या पाकिटाचे वाटप केले. तसेच, परिसरात औषध फवारणी, मास्क वाटप, धान्याचे कीट आदी उपक्रम परिसरात सुरु केले आहेत.

याबाबत बोलताना काटे म्हणाले की, एक सामाजिक जबाबदारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य व केंद्राच्या सहाय्यता कार्यास हातभार लागावा, या हेतूने राज्य विधिमंडळातील विधानसभेचे व विधान परिषदेचे सदस्य यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तसेच संसदेतील लोकसभा व राज्यसभा सदस्यांचे एक महिन्याचे वेतन प्रधानमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय आमचे नेते शरद पवार साहेबांनी घेतला. या आदेशाचे अनुसरण करून, पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी देखील मार्च महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहे. त्यातून रोजंदारी, मोलमजूरी व दैनंदीन काम करणा-या कष्टक-यांना मदत पोहोचविली जाणार आहे.

त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

पिंपळे सौदागर हा परिसर जरी स्मार्ट असला तरी, त्या ठिकाणी राहणाऱ्या काही गोरगरिबांची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे पिंपळे सौदागर परिसरातील गोरगरीब, हातावर पोट असणारे मजूर व कामगारांना अन्नाच्या पाकिटाचे वाटप केले. तसेच परिसरात लॉक डाऊनच्या कालावधीत गोरगरिबांना जमेल तशी मदत करीत आहेत. याकामी स्थानिक कार्यकर्त्यांची मदत होत आहे. कोरोनाचा प्रतिबंध व्हावा यासाठी परिसरात औषध फवारणी, गोरगरिबांना जीवनावश्यक तसेच अत्यावश्यक मदत करीत कोरोना हटावसाठी विशेष प्रयत्न देखील सुरु आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button