breaking-newsमहाराष्ट्र

रायगडावर आज 345 वा शिवराज्याभिषेक सोहळा

रायगड : रायगडावर आज 345 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. दरवर्षी 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमी रायगड किल्ल्यावर दाखल झाले आहेत. अखिल भारतीय राज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड यांच्या संयुक्‍त विद्यमाने हा सोहळा साजरा करण्यात येतो. या महोत्सवास किल्ले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यासह त्यांचे सुपुत्र युवराज शहाजीराजे उपस्थित राहतात.

रायगडावर राज्य राखीव दल, शीघ्रकृती दलाच्या दोन तुकड्या तैनात केल्या आहेत. तीन उपविभागीय पोलिस अधिकारी, नऊ पोलिस निरीक्षक, 18 एपीआय, पीएसआय, 168 कर्मचारी, 25 महिला कर्मचारी, 65 वाहतूक पोलिस, 20 वॉकीटॉकी कर्मचारी यांसह बॉम्ब शोधक पथक तैनात केले आहे.

आजचे कार्यक्रम

सकाळी 6 वा. नगारखाना येथे ध्वजपूजन, 6.50 वा. राजसदरेवर शाहिरी कार्यक्रम, 9.30 वा. छ. शिवाजी महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन, 9.50 वा. छ. संभाजीराजे आणि युवराज शहाजीराजे यांचे राजसदरेवर स्वागत, 10.10 वा. छ. संभाजीराजे यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांवर अभिषेक तसेच मेघडंबरीतील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक, 10.25 वा. समितीचे अध्यक्ष फत्तेसिंग सावंत यांचे प्रास्ताविक, 10.30 वा. छ. संभाजीराजे यांचे शिवरायांना अभिवादन, 11 वा. शिवपालखी सोहळा. या पालखी सोहळ्याची सांगता जगदीश्‍वर मंदिर आणि  छ. शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळी करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button