breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मावळातील कामशेत येथील पाच जणांवर मोक्का, सर्वांना आठ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

लोणावळा – मावळ तालुक्यातील कामशेत परिसरातील संघटित गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई आली आहे. कामशेत शहर व परिसरात टोळी निर्माण करून संघटितपणे गुन्हे करून दहशत पसरविणाऱ्या चॉकलेट टोळीतील पाच जणांवर कामशेत पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई करत त्यांना अटक केली आहे. मोक्का विशेष न्यायालयाने या पाच जणांना आठ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

धनेश उर्फ चॉकलेट दिलीप शिंदे, रोशन उर्फ दिग्या बाळू शिंदे, अनिकेत संभाजी शिंदे, श्रीधर श्रीकांत हुले, प्रणीत उर्फ रिंकू दाभाडे अशी मोक्का अंतर्गत कारवाई करत पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे आहेत.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धनेश उर्फ चॉकलेट दिलीप शिंदे (रा. कामशेत) याच्यावर ५ ,रोशन शिंदे याच्या विरुद्ध ५, अनिकेत शिंदे याच्यविरुद्ध ४, श्रीधर हुले याचे विरुद्ध ४, प्रणीत दाभाडे याच्या विरुद्ध २ असे गुन्हे दाखल आहेत. सदरच्या गुन्ह्यांमधील २ गुन्हे हे हिंसाचाराचे भय घालून आर्थिक फायद्यासाठी व बेकायदेशीर लाभासाठी केलेले आहेत.

या टोळीचा प्रमुख धनेश शिंदे व त्याच्या साथीदारांनी मागील १० वर्षांत संघटित गुन्हेगारीचे सदस्य म्हणून चालू ठेवलेल्या बेकायदेशीर कृत्यांमुळे त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा प्रस्ताव कामशेत पोलीस ठाण्यातुन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत विषेश पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला होता.

‌‌विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने कामशेत पोलिसांनी पाच जणांवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करून फरार असलेल्या आरोपींना कामशेत पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

‌‌सदर आरोपींनी १७ सप्टेंबरला दुपारी ३ वाजल्याच्या सुमारास कामशेत येथील राव हॉस्पिटलच्या जवळ एका व्यक्तीस बांधकाम व्यवसायातील कमविलेल्या पैशांतून हप्ता म्हणून १ लाख रुपये दिले नाहीत याचा राग मनात धरून फिर्यादीच्या गाडीवर लोखंडी कोयते, टॉमी व लाकडी दांडक्याने मारले व फिर्यादी गाडीतून खाली उतरल्यावर त्यास मारहाण करून त्याच्याकडील ३७ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पसार झाले होते. या संदर्भात देखील कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button