breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई – भारतीय हवामान विभागाने १३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या काळात राज्यात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविला आहे. विशेषतः किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र झाला आहे. त्यामुळे देशातल्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्या आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि साताऱ्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वारंवार हवामानातल्या बदलामुळे राज्यावर आसमानी संकट असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, 13 ऑक्टोबरपासून ते 17 ऑक्टोबरपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. राज्यात किनारपट्टीलगच्या सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या चक्रीवादळ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी तेलंगणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कर्नाटक, रायलसीमा, दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुर्गम भागांतही जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर, उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा आणि विदर्भातील दुर्गम भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button