breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

राज्यात पुन्हा दूध आंदोलन पेटणार 21 जुलैला राज्यातील दूध संकलन बंद राहणार

कोल्हापूर : कोरोनामुळे अनेक व्यवसाय अचडणीत सापडले आहे. त्यामध्ये दूध व्यवसाय हा सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमूळे दूधाची मागणी 15 ते 20 टक्क्यांपर्यत घसरली आहे. त्यामुळे दूधाचे दर कमी झाले आहे. परिणामी दूध उत्पादक शेतकऱ्यांना कमी दर तसेच वेळेत पैसे मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे.

राज्यसरकारने शेतकऱ्यांना 10 रुपये प्रती लिटर दूधावर अनुदान द्यावे किंवा दूधाचे 30 रुपये प्रतिलिटरने खरेदी करावे अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी 21 जुलैला राज्यातील सर्व दूध संकलन बंद करण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

सरकारने दूधावरील जीसटी मागे घ्यावी, राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रूपये अनुदान द्यावे. केंद्र सरकारने बफर स्टॉक करावा, तसेच दूधाला 30 रुपये भाव द्यावे यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. आम्ही कुणालाही जबरदस्ती करत नाही; मात्र आम्हाला आमचे दूध विकायचे नाही, आम्हाला आमचे दूध संकलन करायचे नाही. ही आमची भूमिका आहे.

दूध उत्पादकांनी आम्हाला सहकार्य करावे. कारण दूध उत्पादकाच्या जीवावर तुमचा धंदा चालतोय याच भान ठेवावा. दूध संघानीही आपले दूध संकलन बंद ठेवावे आणि सहकार्य करावे असे देखील राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button