breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यात काँग्रेसच्या प्रचाराचा धुरळा, राहुल- प्रियांकांच्या 4 सभा होणार

मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने चांगलीच कंबर कसल्याचे दिसत आहे. लोकसभेसाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता गृहित धरून काँग्रेसने राज्यात प्रचाराचे नियोजन चालविले आहे. याचाच भाग म्हणून काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधी यांनी राज्यात दोन सभा घ्याव्यात, असा प्रस्ताव दिल्लीला पाठविला जाणार आहे.

दादरमधील टिळक भवनात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख सुशिलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, संजय निरूपम, नसीम खान यांच्यासह प्रचार समितीतील नेते उपस्थित होते.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सुशिलकुमार शिंदे यांनी सांगितले की, आचारसंहिता लागण्यापूर्वी वातावरणनिर्मिती करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्रात चार सभांचे नियोजन करण्यात आले आहे. यातील दोन सभा प्रियांका गांधी आणि दोन सभा राहुल गांधी व्हाव्यात यासाठी प्रदेश काँग्रेसची प्रचारसमिती केंद्रीय प्रचार समितीकडे शिफारस करणार आहे.

दरम्यान, राहुल यांची पहिली सभा 13 फेब्रुवारी रोजी सुशिलकुमार शिंदे यांच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात घेण्यात येणार आहे. या सभेला राहुल गांधी यांच्यासोबत शरद पवारही हजेरी लावणार आहेत. दरम्यान, उर्वरित तीन सभा कधी आणि कुठे घ्यायच्या यासाठी प्रचार समितीने उपसमित्या स्थापन केल्या आहेत. या उपसमित्या प्रचारासाठी त्या त्या भागात कोण नेते असावेत हे याबाबत पक्ष नेतृत्त्वाकडे शिफारस करतील. त्यानुसार सभांचे नियोजन करण्यात येणार आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button