breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 10,77,374 वर

  • मुंबईत 2,269, पुण्यात 2,579 नवे रुग्ण

मुंबई – सोमवारी आढळलेल्या 17 हजार 66 नव्या कोरोनाबाधितांसह महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्ण संख्या आता 10 लाख 77 हजार 374 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 257 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने कोरोनाबळींचा आकडा 29 हजार 894 इतका झाला आहे. तसेच सोमवारी 15 हजार 789 रुग्ण ठणठणीत झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यासह राज्यात आतापर्यंत 7 लाख 55 हजार 850 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर सध्या 2 लाख 91 हजार 256 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत नियंत्रणात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मुंबईत सोमवारी 2 हजार 269 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 31 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला. यासह मुंबईतील एकूण रुग्ण संख्या 1 लाख 72 हजार 10 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8 हजार 181 इतका झाला आहे. तर सध्या 31 हजार 123 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 2 हजार 579 नवे कोरोना रुग्ण आढळले. रविवारच्या तुलनेत काल कोरोना चाचण्या निम्म्याच घेण्यात आल्याने नवीन रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. कालच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 1 हजार 202 रुग्णांचा समावेश आहे. या नव्या रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 35 हजार 419 वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यात दिवसभरात 25 रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे येथील कोरोनाबळींचा आकडा 4 हजार 838 इतका झाला आहे. तर सध्या 78 हजार 284 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून 1 लाख 52 हजार 297 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button