breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

‘राज्यातली मंदिरं खुली करा’, रोहित पवारांनी राज्य सरकारकडे केली मागणी

पुणे – कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बंद असलेली राज्यातील धार्मिक स्थळे उघडावीत, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर धार्मिक स्थळांना देखील प्रतिबंद घालण्यात आले आहे. मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे प्रशासनाने असा निर्णय घेतला होता.

मात्र, पुनश्च हरिओमच्या घोषणेनंतर देशात अनलॉकची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे उद्योगधंदे, दुकाने खुली करण्यास सरकारकडून परवानगी मिळाली. मात्र, धार्मिक स्थळे खुली करण्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. दरम्यान, रोहित पवार यांनी ट्विटरद्वारे मागणी केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, ”मंदिरं आणि धार्मिक स्थळं लोकांसाठी खुली करायला पाहिजेत, असं माझंही म्हणणं आहे. कारण त्या भागात असलेल्या अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्यामुळं याबाबत मी जरूर पाठपुरावा करील.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button