breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राज्यभर परीक्षांचा गोंधळ; राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेस राजभवनासमोर करणार आंदोलन

पिंपरी |महाईन्यूज

कोरोनाच्या महामारीकडे दुर्लक्ष करत राज्यभर विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, या परीक्षेत प्रचंड प्रमाणात गोंधळ उडाला असून, विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या विद्यापीठानुसार परीक्षा पद्धतीतील त्रुटी व विद्यार्थ्यांच्या अडचणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी राज्यपालांकडे पत्राद्वारे मांडल्या आहेत. अन्यथा राज्यभर तसेच राजभवनासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

नियोजनशुन्यता, मॉक टेस्टचा अभाव, कुशल मनुष्यबळाचा अभाव, अपात्रताधारक सर्व्हिस प्रोव्हायडर, हेल्पलाइन केंद्राची अकार्यक्षमता व प्रशासकीय दिरंगाई, एमसीक्‍यू प्रश्‍नपेढी (QYUESTIONBANK) न पुरवणे यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. डिव्हाईस कनेक्‍टिव्हीटीचा अभाव आहे. ऑनलाइन पेपरचे लॉगइन होत नाही, लॉगइन झाले की पेपर येत नाही आणि पेपर आलाच, तर तो सबमिट होत नाही, असे एक ना अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे.

अनेक विद्यापीठात एकाच दिवशी एकाच वेळी अनेक शाखांचे पेपर घेतले जात असल्याने ऑनलाइन यंत्रणेवरचा ताण येऊन यंत्रणा निकामी ठरत आहे. विद्यार्थ्यांचे हेल्पलाइन नंबरवर आलेले फोनसुद्धा उचलले जात नसल्याचे पुढे येत आहे. एकाच दिवशी एकाच वेळी सर्व शाखांचे पेपर न घेता शाखानिहाय वेगवेगळ्या परीक्षा व्हायला हव्या होत्या. बहुतेक विद्यापीठात अपात्रताधारक सर्व्हिस प्रोवाईडरने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

विविध विद्यापीठांमध्ये निदर्शनास आलेल्या समस्या पुढीलप्रमाणे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर

  • विद्यापीठाने परीक्षेसाठी दिलेली लिंक ओपन होण्यासाठी वेळ लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्याला परीक्षा देण्यासाठी वेळ कमी मिळतो.
  • प्रश्न पत्रिकेत अर्धेच प्रश्न दिसत होते तर अर्ध्या प्रश्नांचे फक्त पर्याय दिसत होते.
  • काही विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका ऑटोमॅटिक सबमिट होत होती.
  • विद्यापीठाने हेल्पलाईन म्हणून दिलेल्या नंबर वर एकदाही फोन घेण्यात आला नाही. 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

  • सलग दुसऱ्यांदा अंतीम वर्षाच्या विद्यार्थांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या.
  • विद्यापीठ प्रशासनाकडून वारंवार परीक्षा प्रक्रिया निर्णयाच्या बाबतीत गोंधळ दिसून येतो.
  • दीड लाख विद्यार्थांच्या परीक्षांसाठी फक्त ४-५ हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

  • विद्यार्थ्यांना प्रश्न न दिसणे,साईट वर फक्त MCQ चे ऑपशन येत होते.
  • वेळोवेळी विद्यापीठाची साईट क्रॅश होते.
  • वेबसाईट मध्ये अडचणी आल्यामुळे परीक्षा वेळेवर सुरू होत नाही.विद्यार्थ्यांना कित्येक तास ताटकळत रहावे लागते.
  • परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे विद्यापीठाची हेल्पलाईन सतत व्यस्त लागत आहे. 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

  • लॉग इन करताना तांत्रिक अडचणी येत आहे.
  • विद्यापीठाने दिलेल्या हेल्प लाईन नंबर द्वारे कुठल्याही प्रकारची मदत विद्यार्थ्यांना होत नाही.
  • परीक्षेच्या वेळेवर पेपर ओपन न होता दोन चार तासांनी पेपर सुरु होत आहे.
  • MBA शाखे च्या विद्यार्थ्यांचं Subject no. 401 नंबर चा पेपर होता लॉग इन केल्या वर subject no. 201 चा पेपर समोर स्क्रीन वर आला.
  • काही विद्यार्थ्यांचा परीक्षेचा टाईम निघुन गेला तरी लॉग इन  झाले नाही.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर

  • पेपर pdf पाठविताना वेळेचं योग्य नियोजन नसून वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या वेळेत पेपर येत नसून उशिरा येत आहे.
  • पेपर सबमिट  करताना वेळेत  सबमिट होत नाही.
  • या संदर्भात तक्रार निवरणाकरता संपर्क साधला असता उडवा उडवीची उत्तरे व अरेरावी ची भाषा वापरली जाते. 

विद्यापीठात या समस्यांचा विद्यार्थ्यांना त्रास

  • नियोजनशुन्यता, मॉक टेस्टचा अभाव, कुशल मनुष्यबळाचा अभाव, अपात्रताधारक सर्विस प्रोव्हायडर, हेल्पलाईन केंद्राची अकार्यक्षमता व प्रशासकीय दिरंगाई, MCQ प्रश्नांची प्रश्नपेढी(QYUESTIONBANK) न पुरवणे यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत.
  • ऑनलाईन परिक्षेत प्रश्न कसे असतील याची माहिती नसल्याने विद्यार्थ्यांना ताण येत आहे.
  • डिव्हाईसचा व कनेक्टिव्हीटीचा अभाव व त्यावर मात केली की ऑनलाईन  पेपरचे लॉगइन होत नाही,  लॉगइन झाले की पेपर येत नाही आणि पेपर आलाच तर तो सबमिट होत नाही असे एक ना अनेक समस्या विद्यार्थ्यांना येत आहे.
  • अनेक विद्यापीठात एकाच दिवशी एकाच वेळी अनेक शाखांचे पेपर घेतले जात आहेत. त्यामुळे ऑनलाईन यंत्रणेवर ताण येऊन यंत्रणा निकामी ठरत आहे. विद्यार्थ्यांचे हेल्पलाईन नंबरवर आलेले फोन सुध्दा उचलले जात नसल्याचे पुढे येत आहे.
  • एकाच दिवशी एकाच वेळी सर्व शाखांचे पेपर न घेता शाखानिहाय वेगवेगळ्या परिक्षा व्हायला हव्या होत्या.त्यामुळे सर्व्हरवर ताण आला नसता.
  • बहुतेक विद्यापीठात अपात्रताधारक सर्विस प्रोवाईडर नेमल्याने मोठी अडचण निर्माण झालेली आहे आपल्याला तिकडेही डोळसपणे पाहावे लागेल.

या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सक्षम आहे असे वाटत नाही. म्हणून आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस विद्यापीठाच्या या नियोजनशून्य कारभाराचा व ढिसाळपणाचा जाहीर निषेध करतो, आता तरी या पुढील सर्व परीक्षा एकतर होम असाईनमेंट (HOME ASSIGNMENT) पद्धतीने व्हाव्यात किंवा परीक्षा पद्धतीतील सर्व अडचणी पूर्णपणे दूर करून मग त्या घेतल्या जाव्यात. या संदर्भात आपण पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांना आपण तसे आदेश द्यावेत व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना मानसिक त्रासातून मुक्त करावे, अशी सूचना अध्यक्ष गव्हाणे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button