breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आपटा : बॉम्ब सापडल्याने एसटी बसचा चालक निलंबित

आपटा येथील एसटी बस बॉम्ब प्रकरणाचा तपास अद्यापही लागलेला नाही, बसमध्ये बॉम्ब ठेवणारा आरोपी मोकाट असला तरी, त्या बसचा चालक मात्र निलंबित झाला आहे, अनधिकृतपणे सामानाची वाहतूक केल्या प्रकरणी त्याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

गजानन जारंडे असं निलंबित करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे, जारंडे हे कर्जत डेपोचे कर्मचारी असून २१ फेब्रुवारी रोजी अलिबाग कर्जत ही बस घेऊन निघाले होते. त्यावेळी अलिबाग येथून एका इसमाने त्यांच्याकडे एक बॉक्स पेण येथे नेण्यासाठी दिला होता. याबाबत त्या इसमाने जारंडे यांना काही रक्कम दिली होती. जारंडे यांनी तो बॉक्स आपल्या सीटच्या मागे ठेवला व पेण येथे आल्यावर दुसऱ्या इसमास दिला.

कर्जत येथे अलिबाग कर्जत बस पोहचल्यानंतर दुसरी बस घेऊन चालक जारंडे कर्जतवरून आपटा येथे वस्तीसाठी आले. त्यानंतर बॉम्ब एसटी बसमध्ये भेटल्याची घटना घडली. या बॉम्ब घटनेचा तपास करीत असता पोलिसांना पेण आगारातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये जारंडे हे अलिबागमधून घेतलेला बॉक्स दुसऱ्या इसमास देताना दिसले. त्यानंतर त्याची चौकशी केली असता, एसटी महामंडळाची फसवणूक करून अनधिकृतपणे सामानाची ने- आण करण्याचे प्रकरण समोर आले आहे.

या फसवणुकीबाबत पोलिसांनी एसटी प्रशासनाला माहिती दिली असून त्याच्या आधारे गजानन जारंडे यांना निलंबित केले असल्याचे विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी सांगितले आहे. त्यामुळे एसटी बसमध्ये ठेवलेला बॉम्ब हासुद्धा असाच कोणी चालकामार्फत दिला आहे का याची कसून चौकशी पोलीस करीत आहेत. मात्र या घटनेने एसटीचे काही चालक अनधिकृतपणे सामानाची ने-आण करण्याचे फसवणुकीचे काम करीत असलेली बाब समोर आली आहे.

आयईडी बॉम्ब कोणी ठेवला हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही, रायगड पोलिसांसह राज्याचं दहशतवाद विरोधी पथक आणि इंटेलिजन्स ब्युरो या प्रकारणाचा तपास करत आहे, पण बसमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या व्यक्तीचा शोध लागू शकलेला नाही, आरोपीचे रेखाचित्रही जारी करण्यात आलेलं नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button