breaking-newsमनोरंजन

रस्त्यावर कचरा टाकणा-याला अनुष्काने विचारला जाब; विराटने शेअर केला व्हिडीओ

मुंबई : सध्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सोशल मीडियावर जास्त सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. त्याने आपली पत्नी अनुष्का शर्मा हिचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये अनुष्का शर्मा रस्त्यावर कचरा टाकणा-या व्यक्तीला जाब विचारताना दिसत आहे.

अनुष्का शर्मा आपल्या कारमधून प्रवास करत असताना एका दुस-या कार मालकाने रस्त्यावर कचरा फेकला. यावेळी अनुष्का शर्माने त्या कारला थांबविले आणि कचरा फेकणा-या कारमालकावर चांगलीच भडकली. तिने रस्त्यावर कचरा का टाकला, असा सवाल करत डस्टबीनमध्ये टाकण्याचा सल्ला दिला. यावेळी तिचा व्हिडीओ बहुतेककरुन विराटनेच काढल्याचे समजते.

दरम्यान, हा व्हिडीओ विराटने ट्विटरवर शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने म्हटले आहे की, या लोकांना रस्त्यावर कचरा टाकल्यानंतर त्यांना योग्य प्रकारे फटकारले. महागड्या कारमध्ये प्रवास करतात पण यांची बुद्धी खराब आहे. अशा व्यक्ती आपला देश स्वच्छ नाही ठेवू शकत का? जर तुम्ही देखील असे होताना पाहिले तर असेच करा. जनजागृती पसरवा.

Virat Kohli

@imVkohli

Saw these people throwing garbage on the road & pulled them up rightfully. Travelling in a luxury car and brains gone for a toss. These people will keep our country clean? Yeah right! If you see something wrong happening like this, do the same & spread awareness. @AnushkaSharma

Virat Kohli

@imVkohli

Saw these people throwing garbage on the road & pulled them up rightfully. Travelling in a luxury car and brains gone for a toss. These people will keep our country clean? Yeah right! If you see something wrong happening like this, do the same & spread awareness. @AnushkaSharma pic.twitter.com/p8flrmcnba

Virat Kohli

@imVkohli

Lot of people who don’t have the courage to do something like this find it funny. Everything for people nowadays is meme content. Shame.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button