breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रमजान ईदनिमित्त सुखसमृध्दीसाठी अल्लाकडे “दुवा”

  • शहरात वेगवेगळ्या भागातील मशिदींमध्ये नमाजपठण

पिंपरी – सर्वत्र अत्तराचा दरवळणारा सुगंध आणि डोक्यावर टोपी परिधान करत पठाणी पेहरावात हजारो मुस्लिम बांधवांनी रमजान ईदनिमित्त नमाजपठण करून शहरातील आपल्या समाजबांधवांना मनापासून शुभेच्छा दिल्या. पिंपरी-चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागात मशिदींमध्ये पवित्र वातावरणात शनिवारी (दि. 16) नमाजपठण करण्यात आले.

शहरातील सुमारे 80 मशिदींमध्ये शनिवारी रमजान ईद साजरी करण्यात आली. पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, कुदळवाडी, नेहरूनगर, काळेवाडी, खराळवाडी, मोरवाडी, मासुळकर कॉलनी, कासारवाडी, जाधववाडी आदी परिसरातील मस्जिद ईदगाह मैदानावरती आज सकाळी नऊच्या सुमारास हजारो मुस्लिम बांधवांनी रमजान ईद ची ईद-उल-फित्रची नमाज अदा केली. नमाज पठाणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद मुबारक म्हणत गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या. यानंतर अनेक मुस्लीम बांधवांनी रमजान ईद निमित्त शिरखुर्मा हा सुक्या मेव्यापासून तयार केलेल्या गोड पदार्थाची मेजवानी देऊन मोठ्या उत्साहात ईद साजरी केली.

ईदनिमित अनेक मुस्लिम बांधवांनी गोर गरीब नागरिकांना जकात फित्राचे वाटप केले. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात मोठ्या असलेल्या नेहरूनगर येथील ईदगाह मैदानावर शनिवारी सकाळी नऊ वाजता मौलाना आझाद व मौलाना हाफिज यांनी रमजान ईदनिमित्त ईदुल फित्रची दोन रखात नमजाचे पठण करून मुस्लिम बांधवांना रमजान ईदचे महत्त्व सांगितले. यावेळी नेहरूनगर, संततुकारामनगर, वल्लभनगर, मासुळकर कॉलनी, मोरवाडी, बालाजीनगर, यशवंतनगर, फुलेनगर, गवळीमाथा आदी परिसरातील हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे रमजान ईद ची ईद-उल-फित्र ही नमाज अदा केली. अल्लाजवळ सर्व नागरिकांच्या सुखसमृद्धीसाठी दुवा केली.

कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड मुस्लिम वेलफेयर अॅण्ड कब्रस्थान ईदगाह कमिटीचे अध्यक्ष ए. बी. शेख, फारूक इनामदार, जिलानी मुलानी, नादिर शेख, कादर शेख, जिलाणी शेख, मीरा तराजगार, जाकीर शेख आदींनी केले होते. यावेळी माजी महापौर हनुमंतराव भोसले, नगरसेवक राहुल भोसले, नगरसेविका वैशाली घोडेकर, आदींनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सांगवी परिसरातील श्रृष्टी चौक, दापोडी रोडवरील आणि जुनी संगवीतील ईदगाह स्थानिक मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button