breaking-newsराष्ट्रिय

येडियुरप्पा यांचे मानसिक संतुलन ढासळले – सिद्धरामय्या

बंगळूरू : कर्नाटक विधानसभेच्या २२२ जागांसाठी मतदान सुरु आहे. मात्र मतदानाच्या दिवशीही कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपा नेते बी.एस.येडियुरप्पा यांच्यावर तोंडसुख घेतले. येडियुरप्पा यांच्या २२४ पैकी १५० जागा जिंकण्याच्या दाव्याबद्दल विचारले असता सिद्धरामय्या यांनी, येडियुरप्पा यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते मानसिक दृष्टया अस्थिर झाले आहेत. कर्नाटकात भाजपाला ६०-६५ पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असा दावा सिद्धरामय्या यांनी केला. काँग्रेस पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल असा दावाही त्यांनी केला.

कर्नाटक विधानसभेच्या २२२ जागांसाठी मतदान सुरु आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान झाले आहे. भाजपाकडून येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या दहा दिवसात राज्यात झंझावती प्रचार करत २० सभांना संबोधित केले. निवडणूक आयोगाने बंगळुरुच्या राजेश्वरी नगर आणि आणखी एका मतदारसंघातील मतदान पुढे ढकलले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button