breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: रक्तद्रव वैद्यकीय चाचण्यांना मान्यता

औषध नियंत्रकांनी म्हटले आहे की, भारतीय  वैद्यक संशोधन परिषदेने रक्तद्रवाच्या वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी इच्छुक असलेल्या संस्थांची यादी सादर केली होती. आरोग्य संशोधन संस्थेशी सल्लामसलतीनंतर त्यांना मान्यता देण्यात येत आहे. रक्तद्रव चाचण्या करण्यासाठी एक विषयतज्ज्ञ समिती नेमण्यात आली असून त्या समितीच्या १३ एप्रिलच्या बैठकीत या चाचण्यांना मान्यता देण्यात आली आहे.

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने केलेल्या शिफारशीत रक्तद्रवाच्या वैद्यकीय चाचण्या करण्यास कुठलाही आक्षेप घेण्यात आलेला नाही. त्यातील पद्धतीत काही बदल सुचवण्यात आले आहेत. औषधे व वैद्यकीय चाचण्या अधिनियम २०१९ नुसार या चाचण्यांना परवानगी देण्यात आली आहे. रक्तद्रव उपचार पद्धतीत बऱ्या झालेल्या करोना रुग्णाचा रक्तद्रव हा गंभीर रुग्णांना टोचला जातो. बऱ्या झालेल्या रुग्णाच्या रक्तात करोनाविरोधी प्रतिपिंड असल्याने ते गंभीर रुग्णाला मिळल्याने त्याला लवकर बरे वाटण्यास मदत होते.

गुजरात सरकारची तयारी…

गुजरातमध्ये मृतांची संख्या वेगाने वाढत असताना आता करोनाच्या गंभीर अवस्थेतील रुग्णांवर  रक्तद्रव (प्लाझ्मा) उपचार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अहमदाबाद येथील शासकीय रुग्णालय व महापालिकेचे एसव्हीपी रुग्णालय  यांनी रक्तद्रव उपचार सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तो भारतीय वैद्यक संशोधन परिषदेला पाठवण्यात आला असल्याची माहिती आरोग्य मुख्य सचिव जयंती रवी यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button