breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

‘पुणे तिथे काय उणे!’ एकाच दिवशी ५१ जणांचा वाढदिवस साजरा

पुणे : प्रत्येकजण त्याचा वाढदिवस विविध पद्धतीने साजरा करत असतो. १ जून हा वाढदिवस दिन म्हणून साजरा केला जातो. अनेकांचा या दिवशी वाढदिवस असतो. याच दिवशी पुण्याच्या भोर तालुक्यातील म्हाळवडी गावात एकाच वेळेस ५१ जणांचा केक कापून एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आला. पंचक्रोशीत या वाढदिवसाची चांगलीच चर्चा होत आहे.

म्हाळवडी गावातील युवकांच्या कल्पनेतून १ जून वाढदिवस दिन गावच्या मंदिरात केक कापून वाढदिवस सामुहिक रित्या साजरा करण्यात आला. गावातील दोन वर्षाच्या मुलासह १०४ वर्षाच्या आजीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अशा प्रकारे वाढदिवस साजरा केल्यानं, जेष्ठांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

हेही वाचा – खुशखबर! राज्यात तलाठी पदासाठी 4 हजार 625 जागांची मेगाभरती!

यावेळी ५१ जणांचा वाढदिवस असणाऱ्या ५१ जणांमध्ये गावातील १०१ वर्षाच्या आजींसह २१ महिला आणि ३० पुरूषांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. केक कापून झाल्यानंतर गावकऱ्यांना भोजन आणि पावनखिंड चित्रपटाची मेजवानी देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button