breaking-newsराष्ट्रिय

‘या’ वस्तू होणार स्वस्त ; केंद्र सरकारने जीएसटी दर कमी केला

मुंबई : वस्तू आणि सेवा कर प्रणाली (GST) हळूहळू स्थिरावू लागली असून त्यातून मिळणाऱ्या महसुलात सातत्य आले आहे. त्याचा परिणाम म्हणून केंद्र सरकारने सर्वसामन्यांना मोठा दिलासा दिला. सरकारने माजी अर्थ मंत्री अरुण जेटली यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आज पुन्हा एकदा निवडक वस्तूंवरील कर कमी केला आहे. यात बहुतांश दैनंदिन वापरातील वस्तू आहेत.

केंद्र सरकारच्या कर कपातीनेमुळे साखर, मिठाई, राईचा सॉस, केचअप, साबण, दंतमंजन, मिनरल वॉटर, अगरबत्ती, खाद्य तेल, दुग्धजन्य पदार्थ, हेअर ऑइल, १००० रुपयांपर्यंतचे फुटवेअर, रंग या वस्तूंच्या जीएसटी दरात कपात केली आहेमोदी सरकारचा मोठा निर्णय; करदात्यांना दिली आनंदाची बातमी, आता ४० लाखापर्यंत GST माफ


देशात १ जुलै २०१७ रोजी जीएसटी लागू करण्यात आला. ही कर प्रणाली लागू झाल्यापासून सातत्याने जीएसटी दर कमी करण्यात आला असल्याचे सरकारने म्हटलं आहे. आता केवळ लक्झुरी वस्तूंसाठी २८ टक्के जीएसटी आहे. एकूण २३० वस्तूंपैकी २०० वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला असल्याचे अर्थ खात्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

याशिवाय जीएसटी लागू झाल्यानंतर जीएसटी करदात्यांच्या संख्या दुप्पट झाली आहे. सध्या १ कोटी २४ लाख जीएसटी करदाते आहेत. संपूर्ण जीएसटी प्रक्रिया आता स्वयंचलित झाली असल्याचा दावा अर्थ खात्याने केला आहे. आतापर्यंत जीएसटी प्रणालीत ५० कोटी कर परतावे देण्यात आले. तर १३१ कोटी ई वे बिल तयार झाली असल्याचे सरकारने म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button