breaking-newsक्रिडामनोरंजन

‘या’ एका चुकीमुळे विरूष्का झाले ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांची जोडी नेहमीच अनेकांच्या चर्चेचा विषय असते. काही दिवसांपूर्वी दोघांची एक जाहिरात प्रदर्शित झाली होती. या जाहिरातीत प्रियकर-प्रेयसीच्या म्हणून दोघांची केमिस्ट्री अक्षरश: दृष्ट लागण्यासारखीच होती. त्यामुळे यांची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र या चर्चेला गालबोट लागलं असून सध्या विरुष्कावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठविली आहे.

विराट आणि अनुष्का या दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम साऱ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच त्यांना विरुष्का हे नावदेखील मिळालं आहे. प्रत्येक ठिकाणी एकत्र वावरणारी जोडी नुकतीच विमानतळावर दिसून आली. मात्र यावेळी एका चाहत्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते ट्रोल झाले आहेत.

मुंबई विमानतळावरुन बाहेर पडताना विरुष्का भोवती अनेक चाहत्यांनी घोळका केला होता. विरुष्काच्या एका चाहत्याने त्यांच्यासाठी एक खास फोटोंचा कोलाज तयार करुन आणला होता. हे कोलाज विरुष्कापर्यंत पोहोचावं यासाठी हा चाहता प्रयत्न करत होता. मात्र विरुष्काने या चाहत्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं.

दरम्यान, विरुष्काने या चाहत्याला केवळ धन्यवाद केलं आणि त्याचं गिफ्ट न घेताच पुढे रवाना झाले. या संबंधित प्रकाराचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका केली जात आहे. काही नेटकऱ्यांनी विराटला उद्धट म्हटलं आहे. तर काहींनी विरुष्काला वागण्याची पद्धत नसल्याचं म्हटलं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button