breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

‘या’पाच कंपन्या येत्या काही महिन्यात बाजारात आणताहेत एसयूव्हीची ५ नवी मॉडेल्स

लॉकडाऊन संपल्यानंतर दरमहिन्यात गाड्यांच्या विक्रीतील सुधारणेने वाहन निर्मात्या कंपन्यांचा उत्साह वाढला आहे. एकट्या ऑगस्ट महिन्यात देशाच्या सहा कार कंपन्या मध्यम श्रेणीतील नव्या गाड्या लाँच करण्याच्या तयारीत आहेत. देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुतीने लाँचिंगची सुरुवातही केली आहे. आता आरोग्याच्या कारणांमुळे लोक जास्त कार खरेदी करतील. अशा स्थितीत कार कंपन्या नवे मॉडेल उतरवत ग्राहकांना आकर्षित करत आहेत. या महिन्यात येणाऱ्या नव्या गाड्यांवर दृष्टिक्षेप टाकू.

टाटा मोटर्स : एचबीएक्स एसयूव्ही

​​​​​​​टाटा मोटर्सने फेब्रुवारीत झालेल्या २०२० ऑटो एक्स्पोमध्ये एचबीएक्स कन्सेप्ट मिनी एसयूव्ही सादर केली हाेती. आता ऑगस्टमध्ये हिची लाँच करण्याची तयारी आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत ५ लाख असू शकते. टाटा मोटर्सने एचबीएक्स मायक्रोला एक ऑफ रोडर मायक्रो एसयूव्हीप्रमाणे डिझाइन केले आहे.

मारुती सुझुकी | एस क्रॉस पेट्रोल

मारुती सुझुकीने एस-क्रॉस पेट्रोल ४ प्रकारात लाँच केली आहे. यात १.५ लिटरची सिरीज बीएस६ पेट्रोल इंजिन आहे. हे ६००० आरपीएमवर ७७ केडब्ल्यूची शक्ती व ४४०० आरपीएमवर १३८चा टॉर्क तयार करते. इंजिन अॅडव्हान्स्ड ४ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले आहे. ही १८.५५ चे मायलेज देण्यास सक्षम आहे. पेट्रोल व्हर्जनची सुरुवातीची किंमत ८,३९,००० रु.

किया मोटर्स : सोनेट

किया मोटर्स इंडियाची कॉम्पॅक्ट एसयूव्ही किया सोनेट ७ ऑगस्टला बाजारात येईल. नवी सोनेट जीटी लाइन आणि टेक लाइनमध्ये येईल. हिची किंमत सात लाखांपासून ११.५ लाख रुपयांपर्यंत राहील. सोनेटमध्ये कियाची सिग्नेचर स्टाइल एलिमेंट्स उदा. फ्रंट टायगर-नोज ग्रिल आणि थ्री-डायमेन्शनल स्टेप-वेल जियोमेट्रिक ग्रिल मेशसह एक बोल्ड आणि डायनामिक डिझाइन दिली आहे.

महिंद्रा | एक्सयूव्ही ३०० स्पोर्ट्‌स

महिंद्रा १४ ऑगस्ट रोजी सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही महिंद्रा एक्सयूव्ही ३०० स्पोर्ट्‌स लाँच करेल. यामध्ये १.२ लिटर, १.५ लिटर आणि २.० लिटर टर्बो-पेट्रोल डायरेक्ट इंजेक्शन इंजिन आहे. हे १३० बीएचपी, १६३ बीएचपी आणि १९० बीएचपीची शक्ती देते. ही ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सयुक्त आहे. यामध्ये रेड फ्रंट ब्रेक कॅलिपर दिले आहेत. हिची किंमत १२.३० लाख ते १२.५० लाखांदरम्यान राहण्याची शक्यता आहे.

टोयोटा : अर्बन क्रुझर

ऑगस्टमध्ये सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही टोयोटा अर्बन क्रुझर नावाने लाँच करू शकते. अर्बन क्रुझर एसयूव्ही प्रामुख्याने मारुती सुझुकीची व्हिटारा ब्रेझाचे रिबॅच व्हर्जन आहे. हिची किंमत ८ ते ११.५ लाख रुपयांत असेल. ही टोयोटा-सुझुकीच्या भागीदारीअंतर्गत येणारी दुसरी कार असेल. या भागीदारीअंतर्गत पहिली टोयोटा ग्लान्झा आली होती. टोयाेटो अर्बन क्रुझरमध्ये १.५ लिटर के-सिरीज पेट्रोल इंजिन मिळेल. हे इंजिन १०३ बीएचपीची शक्ती आणि १३८ एनएम टॉर्क देते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button