मोशीत प्लास्टिक पिशव्या वापरणा-या दुकानावर दंडात्मक कारवाई
पिंपरी, (महाईन्यूज) – प्लास्टिक वापरावर निर्बंध असतांनाही व्यावसायिक वापरासाठी उपयोग करणाऱ्या स्पाईन चौक मोशी परिसरातील व्यावसायिकांकडून सुमारे ८५ किलो प्लास्टिक जप्त करून २३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाने ही कारवाई आज केली. परिसर स्वच्छता व प्लास्टिक निर्मुलन कारवाईच्या सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉय अनिल रॉय यांनी दिल्या आहेत. त्याअंतर्गत सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य आरोग्य निरीक्षक आर. एम. भोसले, आरोग्य निरीक्षक विजय दवाळे व वैभव कांचनगौडार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
स्पाइन चौक मोशी प्राधिकरण परिसरातील व्यावसायिक अस्थापनांची तपासणी या पथकाने केली. त्यावेळी ऋतिक वाईन्स दुकानातून सुमारे ८० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. शिवाय 23 हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.