breaking-newsआंतरराष्टीय

‘मोदींसारखं खोटं बोलण्यासाठी या तीन गोष्टी करा’, काँग्रेसने ट्विट केला ‘क्रॅश कोर्स’

काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींप्रमाणे खोटं बोलायला शिका अशा मथळ्याखाली काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या तीन सोप्या स्टेप फॉलो करुन तुम्ही ‘भारतातील सर्वात मोठा खोटारडा’ होण्याच्या शर्यतीत मोदींना हरवू शकता, असा मजकूर वापरून काँग्रेसने एक ३ मिनिटे २० सेकंदांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या ट्विटच्या शेवटी #ModiLies हा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे.

काँग्रेसने तयार केलेल्या या व्हिडीओमध्ये उपहासात्मक पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली आहे. सुरुवातील अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे, ‘देअर वील बी नो लाइज’ (म्हणजेच या पुढे खोटे खपवून घेतले जाणार नाही) हे वाक्य दाखवण्यात आले आहे. त्यापाठोपाठ ‘इस सज्जन को क्या तकलीफ हैं भाई’ हे मोदींच्या एक सभेतील त्यांच्याच तोंडचे वाक्य असणारी क्लिप वापरण्यात आली आहे. अनेकदा फॉरवर्ड होणारे मेसेजेस, मोदींकडून देण्यात येणारे चुकीचे संदर्भ या सर्वांचा आधार घेत आम्ही तुम्हाला मोदींप्रमाणे खोटं कसं बोलावं याबद्दलचा हा क्रॅश कोर्स शिकवणार असल्याचे काँग्रेसने व्हिडीओत म्हटले आहे.

पुढे काँग्रेसने मोदींसारखे खोटं बोलण्यासाठी तीन टिप्स या व्हिडीओत दिल्या आहेत. त्यात त्यांची जुनी वक्तव्यांच्या व्हिडीओ क्लिप्सचा वापर करण्यात आला आहे. पहिल्यांदा स्वत: मधील दोष शोधा आणि नंतर ते दुसऱ्यांचे असल्याचे सांगा ही पहिली स्टेप असल्याचे या व्हिडीओत म्हटले आहे. दुसरी स्टेप म्हणजे एखादं वक्तव्य घ्या आणि त्याचा काहीतरी जगावेगळा अर्थ शोधून काढा. दुसरा मुद्दा सांगताना काँग्रेसने काळा पैसा परत आल्यावर १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा होतील या वक्तव्याचा दाखला दिला आहे. तर तिसरी स्टेप म्हणजे प्रत्येक वक्तव्याची सुरुवात भाईओ और बहिनो अशी करा असा सल्ला या क्रॅश कोर्सबद्दल बोलताना काँग्रसने दिला आहे.

व्हिडीओच्या शेवटी पुन्हा एकदा मोदींच्या भाषणातील एक क्लिप वापरुन खोटं कसं बोलावं हे खुद्द मोदीजींकडूनच ऐका असं सांगत वापरण्यात आला आहे. ‘नेहमी खोट बोला, जे बोलता येईल ते खोटं बोला, जिथे आणि जेव्हा जेव्हा बोलता येईल तेव्हा खोटं बोला, कोणत्याही विषयावर बोला पण खोटं बोला.’ असं मोदी एका भाषणादरम्यान बोलतानचा हा व्हिडीओ आहे.

Embedded video

Congress

@INCIndia

Follow this simple 3 step guide & soon enough you’ll beat Modi for the title of India’s biggest liar.

1,218 people are talking about this

आता काँग्रेसच्या या खोचक ट्विटला भाजपा कशाप्रकारे उत्तर देते याबद्दल नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. अनेकदा भाजपा आणि काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरुन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसतात. यामध्ये ट्रेण्डींग हॅशटॅग वापरून किंवा नवीन हॅशटॅग बनवून एकमेकांना लक्ष्य केले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button