breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मुळशी तालुक्याला टेमघरचे धरणाचे पाणी द्यावे : सुप्रिया सुळे

पुणे | महाईन्यूज

मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून मुळशी तालुक्यातील ४७ वाड्यावस्त्यांना टेमघर धरणातून बावधन, भुकुम आणि भूगाव या गावांना पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली आहे. मुळशी, दौंड तालुका आणि खडकवासला मतदारसंघातील रस्ते, ओढ्यांवरील साकव, संरक्षण भिंत अशी विविध कामे करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) सोमवारी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन मतदारसंघातील कामांचा आढावा घेतलेला आहे. पाणी, रस्ते, रिंगरोड व मेट्रो आदी विषयांचा आढावा घेतला आहे.

यावेळी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेश कोंढरे, वैशाली नागवडे, आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. बावधन, भुगाव, भुकुम, लवळे, सूस या शहरालगतच्या गावांमध्ये नागरीकरण झालेले आहे. या गावांमध्ये पिण्याचा पाण्याचा कोणत्याही प्रकारचा स्रोत नाहीयेत. त्यामुळे या गावांना पीएमआरडीए मार्फत टेमघर धरणांमधून पाणी पुरवठा करावा, अशी मागणी सुळे यांनी या बैठकीत केलेली आहे. या विषयावर येत्या महिनाअखेरीस पुन्हा बैठक घेऊन त्यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन पीएमआरडीएकडून देण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button