breaking-newsपिंपरी / चिंचवड
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीने सामाजिक उपक्रम
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी युवासेनेच्या वतीने फुगेवाडी-दापोडीतील गरजू लोकांना शिधा वाटप करण्यात आला. तसेच, दापोडी येथील स्वामी विवेकानंद शाळेतील 60 गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
यावेळी प्रभाकर हिंगे, महेश बोधले, बालाजी गायकवाड, अवीराज जाधव, रोहित गोरे, शैलेश हाके, शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके यांनी केले होते.