breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज भंडारा दौऱ्यावर, रुग्णालयाची करणार पाहणी

भंडारा – भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात आग लागून 10 निष्पाप बालकांचा मृत्यू झाला. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिली. रुग्णालयाच्या सुरक्षेशी तडजोड अजिबात चालणार नाही असे बजावतानाच, राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान आज ते भंडारा दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते रुग्णालयात पाहणी करणार असून मृत बालकांच्या पालकांनाही भेटणार आहेेेत.

या घटनेविषयी कळताच मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. घटनेची विस्तृत माहिती घेऊन वाचलेल्या बालकांच्या उपचारात कोणतीही हयगय होणार नाही हे पाहण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. इमारतीतील बालकांसाठीच्या या नव्या कक्षाचे लोकार्पण २०१५ मध्ये झाले होते. मात्र त्याचे ऑडिट पूर्ण झाले होते किंवा नाही आणि झाले नसेल तर का झाले नव्हते याविषयी संपूर्ण माहिती घेऊन पुढील कारवाई लगेच करण्यात येईल.

असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा

12.15 वा. नागपूर विमानतळ येथे आगमन

12.20 वा. हेलिकॉप्टरने शहापूर, ता.जि भंडाराकडे प्रयाण

12.55 वा जिल्हा सामान्य रूग्णालय दुर्घटनेतील भोजापूर येथील मृत शिशुचे पालकांची भेट

01.20 वा जिल्हा सामान्य रूग्णालय, भंडारा येथील वैद्यकीय शुश्रुषेत असलेल्या शिशुंच्या पालकांची भेट व घटनास्थळाचे निरीक्षण

02.30 वा विमानाने मुंबईकडे प्रयाण

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button