breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमुंबई

मुंबई विद्यापीठाच्या 2019-20 च्या गुरुवारपासून सुरु झालेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरळीत सुरु

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या अंतिम वर्षाच्या परीक्षा गुरुवारपासून सुरू झाल्या. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित कॉलेजे, विद्यापीठ शैक्षणिक विभाग आणि दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. चारही विद्याशाखेअंतर्गत विविध अभ्यासक्रम आणि विषयांच्या परीक्षा आज सुरळीत पार पडल्या.

अत्यंत सुलभ अशा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यापीठाने आणि कॉलेजांनी ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरूपात परीक्षा घेतल्या. परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठ आणि संलग्नित कॉलेजांनी विद्यार्थ्यांना नमुना प्रश्नपत्र व त्यांच्या सराव परीक्षाही घेण्यात आल्या होत्या. काही विषयांच्या सराव परीक्षा अजूनही घेतल्या जाणार आहेत. काही अपरिहार्य किंवा तांत्रिक कारणास्तव एखादा विद्यार्थी परीक्षेला बसू शकला नसेल अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

बॅकलॉग आणि नियमित परीक्षांच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाने विद्याशाखानिहाय कॉलेजांचे ९४ समूह तयार केले आहेत. परीक्षांविषयक घडामोडी आणि आनुषंगिक बाबींसाठी विद्यापीठाने कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली निरीक्षण समिती तयार केली असून या समितीमध्ये प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांच्यासह सर्व अधिष्ठाता, सहाय्यक अधिष्ठाता, जिल्हानिहाय समन्वयक, प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ यांचा समावेश आहे.

इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या ‘एमएचटी-सीईटी’ला गुरुवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी नोंदणी केलेल्यांपैकी ७५ टक्के विद्यार्थांनी ऑनलाइन परीक्षा दिली. ‘पीसीबी’ ग्रुपच्या परीक्षेत फिजिक्समधील प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक होती. त्याखालोखाल रसायनशास्त्रातील प्रश्नही काहीसे कठिण असल्याने गुणवत्तेचा कस लागला, अशी चर्चा परीक्षार्थींमध्ये होती. पहिल्या टप्प्यात फिजिक्स, केमिस्ट्री, जीवशास्त्र (पीसीबी) ग्रुपमधील विद्यार्थ्यांची परीक्षा होत आहे. ९ ऑक्टोबरपर्यंत या ग्रुपची परीक्षा चालणार आहे. त्यानंतर १२ ते २० ऑक्टोबर दरम्यान पीसीएम ग्रुपची परीक्षा होणार आहे. सीईटीसाठी चार लाख ५१ हजार ९०६ परीक्षार्थींनी नोंदणी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button