breaking-newsमुंबई

मुंबई पोलिसांची पत्रकारांना मारहाण

मुंबई | मुंबईमध्ये नागपाडा येथे मुंबई सेट्रल बसस्टाँपजवळ सीएए विरोधात महिलाचे आंदोलन सुरु असताना बातमीसाठी आलेल्या पत्रकारास पोलिसांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

तिथे पत्रकार व छायाचित्रपत्रकार सर्वच बातमीसाठी उपस्थित असताना एका पोलीस अधिकार्याला सांगुन पत्रकार सतीश माळवदे व आशिश राजे बाहेर पडले, परत आल्यावर तिथे दुसरे पोलीस अधिकारी होते. शेख नावाचे अधिकारी यांनी या दोघांना ओळखपत्र काढण्याची वाटही न पहाता दादागिरी करुन मारहाण सुरु केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या पोलीसांवर कठोर कारवाई व्हावी आणि वेळीच पोलीस वर्गाला लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाशी कसे सन्मानाने वागावे याची समज महाराष्ट्राच्या गृहमंत्री अनिल देशमुखजी यांनी द्यावी तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकार सन्मान व समन्वयासाठी एक धोरण आखावे, जेणेकरून हर एकवेळा असे अपमानित होण्याची वेळ आम्हा पत्रकारांवर येणार नाही. अशी मागणी एनयुजे महाराष्ट्रच्या अध्यक्षा शीतल करदेकर व सरचिटणीस सीमा भोईर यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button