breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साई मंदिरात काकड आरतीचा मान मिळण्यासाठी २५ हजारांची मागणी, दिल्लीतील भक्ताचा आरोप

शिर्डी – शिर्डीतील साई मंदिरात काकड आरती करण्यासाठई २५ हजाररुपये मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साई संस्थानच्या पीआरओ कार्यालयातून काकड आरतीचा पास मिळण्यासाठी २५ हजार रुपयांचे डोनेशन मागितल्याचा आरोप दिल्लीतील साई भक्ताने केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यातील मंदिर सुरू करण्यात आली आणि नियमावलीसह मंदिरात प्रवेश सुरू झाला. साई मंदिरात वाढती गर्दी लक्षात घेत दररोज 12 ते 15 हजार भाविकांना साई दर्शन आणि मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत मंदिरातील सर्व आरत्या पार पडणार असल्याच नियोजन करण्यात आलं आहे. या नियोजनात ऑनलाईन सुविधेवर जास्त भर देण्यात आलं.

मात्र 15 दिवस प्रयत्न करून काकड आरतीचा पास मिळत नसल्याने दिल्ली येथील साई भक्तांनी शिर्डीतील पी आर ओ ऑफिसला जात आरतीचा पास मिळण्यासाठी प्रयत्न केले असता जर 25 हजार रुपये डोनेशन दिल तर काकड आरतीचा पास उपलब्ध होईल अस उत्तर मिळाला असल्याचा आरोप दिल्ली येथील महिला साईभक्तांनी केलाय. जो प्रथम येईल त्याला पास मिळाला पाहिजे असं सांगताना 15 दिवस ऑनलाईन पास मिळत नाही आणि इथे आल्यावर डोनेशन दिले तर पास मिळेल असं सांगितलं जात असल्यानं या महिलांनी संस्थानच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केलाय. साई संस्थानने याबाबत अजूनतरी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button