breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अशोक डकयांची निवड

मुंबई । प्रतिनिधी

गेली सहा वर्षे प्रशासकीय राजवट असलेल्या राज्यातील सर्वात मोठय़ा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर अखेर सभापती, उपसभापतींची बिनविरोध निवड झाली. सभापतीपदी मराठवाडय़ातील अशोक डक यांची तर उपसभापतीपदी पुण्याच्या धनंजय वाडकर यांची निवड झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते मंगळवारी अशोक डक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुंबई येथील पक्षाच्या कार्यालयात सहकारी पदाधिकारीही उपस्थित होते.

राज्यातील १२ शेतकरी प्रतिनिधी व बाजार समितीच्या पाच जागांच्या संचालक पदासाठी ही निवडणूक झाली होती. तसेच कामगार प्रतिनिधी मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली होती. महाविकास आघाडीचे १६ तर दोन अपक्ष विजयी झाले होते.

करोना सावट आणि  १५ मार्चनंतर टाळेबंदी जाहीर झाली त्यामुळे सभापतीपदाची निवडणूक लांबली होती. नुकताच केंद्र शासनाने बाजार समितीतून सर्व शेतमालाला नियमनमुक्त केले आहे. त्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात घट होणार असून, अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे आता नव्या संचालक मंडळापुढे आव्हान आहे.

शेतकरी आणि व्यापारी या दोघांमध्ये समन्वय साधून हे नवीन संचालक मंडळ या दोन्हीमधील एक दुवा म्हणून समितीच्या उत्कर्षांसाठी काम करेल. केंद्र शासनाने नियमनमुक्तीच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करू नये असे निवेदन मुख्यमंत्री, सहकार-पणनमंत्री यांना देण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button