breaking-newsमहाराष्ट्र

मुंबईसह कोकण, गोवा, ठाणे, पालघरात अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा

मुंबई : मुंबई आणि महानगरात पावसाचा जोर सुरूच आहे. येत्या 24 तासांत कोकण पट्यात अतीमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणि कोरोनाच्या संकटात बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना आजही अतिवृष्टीचा सामना करावा लागणार आहे. येत्या 72 तासात कोकण, गोवा, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. तसेच घाटमाथा, पुणे आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे पुणे वेधशाळेचे प्रमुख संशोधक डॉ.अनुपम कश्यपी यांनी म्हटले आहे.

गेल्या 12 तासात मुंबई शहरात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. 150 मि.मी. पेक्षा जास्त पावसासह पश्चिम उपनगरात पावसाचा जास्त परिणाम पाहायला मिळाला. सोमवारी रात्री आणि मंगळवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने मुंबई उपनगरात सुमारे 300 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, मुंबईत आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाच्या 81% पावसाची नोंद करण्यात आली आहे. पण सततच्या पावसामुळे मुंबईतीचा वेग पुन्हा मंदावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button