breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबईनंतर नवी मुंबईतही आढळला करोनाचा रुग्ण

मुंबई | महाईन्यूज

मुंबईनंतर आता नवी मुंबईतही करोना विषाणुचा नवा रुग्ण आढळला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 39 वर पोहोचली आहे. दिवसभरात राज्यात मुंबईत 4, यवतमाळमध्ये एक आणि नवी मुंबईत एक असे एकूण 6 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात कोणत्या ठिकाणी कोरोनाव्हायरसचे किती रुग्ण आहेत, याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट केलं आहे. खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत.  शाळा, महाविद्यालय आणि राज्यातील सर्व विद्यापीठ परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहेत, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसंच महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे, तशी शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button