breaking-newsमुंबई
मुंबईत २९ मतिमंद मुलांना कोरोनाची लागण
मुंबई : मुंबईतील काही भागात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. मुंबईत २९ मतिमंद मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मतीमंद मुलांचे वसतिगृह असलेल्या चिल्ड्रन अँड सोसायटी मानखुर्द येथील ही सर्व मुले असल्याची माहिती मिळत आहे.
मतीमंद मुलांपैकी २४ मुले व ५ मुली कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. सर्व मुलांना विविध आजार असल्याने त्यांना उपचारासाठी आणि संसर्ग वाढू नये यासाठी विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे.
दरम्यान, वस्तीगृहात बंदी असतानाही कोरोनाचा संसर्ग कसा झाला हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा शिरकाव झाला तरी कसा, याचा आता संबंधित यंत्रणेकडून शोध घेण्यात येत आहे. तसेच, या सर्व मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जात आहे.