breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईत दुमजली इमारत कोसळून तीन कामगारांचा मृत्यू

मुंबई: मुंबईतील गोरेगावमध्ये बांधकाम सुरु असलेली दुमजली इमारत कोसळून तीन कामगारांचा मृत्यू, तर 8 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना जुन्या घराच्या जागेवर दुरुस्तीचे बांधकाम सुरू असताना घडली.

मृतांमध्ये 27 वर्षीय रमन कुमार आणि इतर दोन जणांचा समावेश आहे. गोरेगावच्या मोतीलाल नगर परिसरातील घरांवर अनाधिकृतपणे दोन मजले बांधले जात होते. बांधकाम सुरु असलेली इमारत सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली. यावेळी घरात एकूण 11 कामगार आणि त्यांचे कुटुंबिय काम करत होते.

इमारत कोसळ्याने हे सर्व जण ढिगाऱ्याखाली अडकले. इमारत कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनस्थळी धाव घेतली. स्थानिकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 9 जणांना बाहेर काढले. दरम्यान एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला होता.

काही वेळातच एडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेतला. एनडीआरएफच्या जवानांना दोन कामकारांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button