breaking-newsमनोरंजन

मुंबईत टीव्ही अभिनेत्रीने राहत्या घरी केली आत्महत्या

मुंबई | प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सेजल शर्मा हिने मिरा रोड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ‘दिल तो हॅपी है जी’ या मालिकेतील भूमिकेमुळे सेजल शर्मा ही प्रकाशझोतात आली होती. काम मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचे सुसाइड नोटमधून स्पष्ट झाले आहे. सेजलच्या आत्महत्येमुळे सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.

मिरा रोड येथील शिवार गार्डन भागातील रॉयल नेस्ट इमारतीत सेजल शर्मा आपल्या मैत्रिणीसह राहत होती. याच घरात तिने आज पहाटे चार वाजताच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. सेजल ही मूळची राजस्थानमधील उदयपूर येथील होती. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. तसेच अंत्यसंस्कारासाठी तिचे पार्थिव उदयपूरला नेण्यात आले आहे.

स्टार प्लस वाहिनीवरील दिल तो हॅपी है जी या मालिकेत सेजल मध्यवर्ती भूमिका साकारत होती. या मालिकेचे १८ भाग झाल्यावर ही मालिका ९ ऑगस्ट २०१९ला बंद झाली. त्यानंतर सेजलच्या हातात काहीच काम नव्हते. इतक्या महिन्यांनंतर सेजलला काही काम न मिळाल्यामुळे तिला नैराश्य आले. ‘गेल्या दीड महिन्यापासून मी नैराश्येत असून त्यामुळेच मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये’ अशी सुसाइड नोट सेजलने लिहून ठेवली असून त्याआधारे मिरा रोड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button