breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत घरीच होणार कोरोनाची चाचणी;

पाच खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांच्या सुविधा उपलब्ध

मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांना कोरोना चाचणीसाठी पाच खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांची सेवा उपलब्ध झाली आहे. शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार या खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांना जास्तीत जास्त 4500 रुपये एवढे शुल्क एका चाचणीसाठी आकारता येणार आहे.

मुंबई : ‘कोरोना कोविड 19’ या विषाणूजन्य आजाराचा मुकाबला करण्यासाठी मुंबई महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर नागरिकांना अधिकाधिक वैद्यकीय सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी महापालिका विविध स्तरावर देखील संवाद व समन्वय नियमितपणे साधत आहे. महापालिकेच्या याच प्रयत्नांमुळे आजपासून मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांना कोरोना चाचणीसाठी पाच खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांची सेवा उपलब्ध झाली आहे.

विशेष म्हणजे नागरिक या प्रयोगशाळांशी संपर्क साधून व तेथील तज्ज्ञांना आपल्या घरी बोलावून चाचणी करवून घेऊ शकणार आहेत. शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार या खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांना जास्तीत जास्त 4500 रुपये एवढे शुल्क एका चाचणीसाठी आकारता येणार आहे.
कोरोना व्हायरसची चाचणी उपलब्ध असलेल्या पाच खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांची नावे व संपर्क क्रमांक
सबर्बन डायग्नोस्टिक्स : 022-6170-0019
थायरोकेअर : 9702-466-333

मेट्रोपोलीस : 8422-801-801

सर एच एन‌ रिलायन्स : 9820-043-966

एसआरएल लॅब

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button