breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मी दिवसाआड पाणीपुरवठा केलेला नाही, महापाैर राहूल जाधव यांचा खुलासा

पवना जलवाहिनी योजना अपुर्ण राहिल्याची खंत, मेट्रोचे उद्घाटनपण राहिल्याची भावना

पिंपरी | महाईन्यूज |

पिंपरी चिंचवड शहराला सोमवार (दि.25) दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय, यावरुन मी दिवसाआड पाणी पुरवठा केलेला नाही, तर आयुक्तांना हा निर्णय घेण्यास प्रोत्साहित केले नाही. सर्वपक्षीय नेत्यांनी बैठकीत हा दिवसाआड पाण्याचा निर्णय झालेला आहे. असा खुलासा महापाैर राहूल जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, येत्या दोन महिन्यात उर्वरीत कामे केल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशीही अपेक्षा महापाैर जाधव यांनी व्यक्त केली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदाचा कार्यकाळ आज (गुरुवारी) पुर्ण झाला. त्यावरुन गेल्या सव्वा वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामाचा महापाैर राहूल जाधव यांनी लेखाजोखा मांडला.

महापाैर जाधव म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरवासियांना मी शब्द दिला होता. माझ्या कार्यकाळात पवना बंदिस्त जलवाहिनी योजनेचे काम मार्गी लावणार होतो. त्याकरिता राज्य पातळीवर पाठपुरावा पण घेतला. परंतू, माझ्या कारकिर्दीत हे मार्गी लावू शकलो नाही. याविषयी माझ्या मनात कायम खंत राहणार आहे. तसेच शहरातील सिटी सेंटर व महापौर निवास देखील पुर्ण करण्यास यश मिळाले नाही.

शहरातील शाळा, उद्याने, क्रीडांगणे, नदी, नाले, स्मशानभूमी यांची पाहणी करुन आवश्यक त्या सुधारणा केल्या. परदेशात शहराचा विकास मांडण्याची संधी मिळाल्याचा आहे. शहरातील सर्व आरक्षित जागांची प्रथम माहिती घेऊन सोयी-सुविधांचे कामकाज विभागांच्या माध्यमांतून सुरु करणे, विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला. प्रथमच नव्याने समाविष्ट गावांसाठी रस्ते विकास धोरण राबविले. या अंतर्गत सुमारे 425 कोटीच्या 50 नवीन रस्ते बांधणीचे काम सुरु आहे.

जाधववाडी प्रभागातील साई जीवन शाळेजवळ मैदान विकसित केले. जाधववाडीमधील गट नं. 539 विकसित केला. जाधववाडी मधील गट नंबर 606 आरक्षण क्र.1/446 येथे माध्यमिक शाळेची इमारत बांधली. बो-हाडेवाडी येथील ताब्यात येणा-या गायरान जागेतील शाळा बांधण्याचे काम केले. जाधववाडी, कुदळवाडीमधील अंतर्गत रस्ते हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण केले. रस्ते विकसित केले.

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहराची ओळख वाढत आहे. स्मार्ट सिटीमुळे शहराचा नावलौकिकात भर पडत आहे. जगाच्या नकाशावर विकसनशील असे पिंपरी-चिंचवड शहर भविष्यात दिसेल. शहरात लवकरच मेट्रो धावणार आहे. पुढील काही महिन्यात नागरिकांना मेट्रोची सुविधा मिळेल, असा विश्वासही महापौर जाधव यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button