breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

कुदळवाडीतील नागरिकांना आरोग्याचे ‘अच्छे दिन’

  • आरोग्य सेवेसाठी नागरिकांच्या खिशातून होणारा खर्च वाचणार

पिंपरी |

कुदळवाडीमधील नागरिकांना आरोग्याचे ‘अच्छे दिन’ येणार आहेत. शहर भाजयुमो सरचिटणीस तथा स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना – आयुष्यमान भारत’ अंतर्गत मोफत ५ लाखांचे आरोग्य विमा कवच काढून सर्वाना आरोग्य सेवा’ देण्याचे ध्येय ठेवले आहे. यामुळे आरोग्य सेवेसाठी नागरिकांच्या खिशातून होणारा खर्च कमी होणार आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करता विधायक कामे हाती घ्या असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत यादव हे कुदळवाडीमधील नागरिकांना केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना – आयुष्यमान भारत’ अंतर्गत मोफत ५ लाखांचे आरोग्य विमा कवच काढून देणार आहेत.या योजनेचे उद्घाटन भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते होणार आहे.

नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी गुरुवारी (दि. २२) रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत स्वतःचे आधारकार्ड, पंतप्रधान योजनेचे पत्र किंवा रेशन कार्ड, ज्यांना पत्र मिळाले नाही त्यांनी रेशनकार्ड व आधारकार्ड घेऊन आपले नाव यादीमध्ये तपासुन घ्यावे. यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी कुदळवाडीतील शिवसाई पतसंस्था शेजारी, विठ्ठल – रुख्मिणी मंदिराजवळील कार्यालयात अथवा योजनेच्या अधिक माहितीसाठी काका शेळके ( 9881245572), दिपक घन ( 98909ए 02805) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

” दवाखान्याची पायरी चढण्याची वेळ कोणावर येऊ नये असे म्हटले जाते. मात्र ही वेळ कधी येईल सांगता येत नाही.त्यामुळे आयुष्यमान भारत सारख्या योजनेचा लाभ कुदळवाडीतील नागरीकांना मिळवून देणार आहे. पाच लाखांचे आरोग्य विमा कवच या योजनेद्वारे मिळते. तीस हजारापासून 3 लाखांपर्यंतचे उपचार या योजनेद्वारे घेता येतात. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नागरिकांना केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button