breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिस पुणे फेस्टिव्हलमध्ये कृष्णा वैद्य प्रथम

पुणे – पुणे फेस्टिव्हलमध्ये झालेल्या ‘मिस पुणे फेस्टिव्हल’ स्पर्धेत कृष्णा वैद्य यांनी प्रथम क्रमांक मिळवून मानाचा मुकुट मिळवला. द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे काविया ज्योती व सिम्रन नाईक यांना मिळाला. सानिया चौधरी, रुची हेंद्रे, पूजा मिरारी, स्नेहल खोमणे आणि सृष्टी गव्हांडे यांनाही विविध पारितोषिके दिली.

अभिनेत्री प्राजक्ता माळी, डॉ. राधिका वाघ आणि सुप्रिया ताम्हाणे यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, मॉडेल अभ्यंग कुवळेकर, मोहन टिल्लू, तन्वी माने, दिग्दर्शक देवेंद्र शिंदे, दिग्दर्शक प्रशांत गिरकर उपस्थित होते. स्पर्धेत १८ ते २५ वर्षे वयोगटातील शंभर युवतींनी सहभाग घेतला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button