breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बायकोचं दुसरीकडे झेंगाट असल्याचे ऐकताच तरुणाची आत्महत्या

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

आपल्या बायकोचं दुसरीकडं झेंगाट सुरू असल्याची माहिती मिळताच पुण्यात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वर दत्तू कांबळे (रा.मोशी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ज्ञानेश्वरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी त्याच्या बायकोच्या गावातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी अजय नंदकुमाप घाडगे आणि बालाजी अशोक येडके (दोन्ही रा. देवळाई, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) या दोघाजण ज्ञानेश्वरच्या सासरवाडीचे रहिवासी आहेत. ज्ञानेश्वर आणि त्यांची काही महिन्यांपूर्वी मैत्री झाली होती. एके दिवशी दोघांनी ज्ञानेश्वरला खूप दारू पाजली. एवढेच नाही तर ‘तुझ्या बायकोचे दुसरीकडे झेंगाट सुरू आहे’, असेही सांगितले. यावरून ज्ञानेश्वरचा प्रचंड संताप झाला. त्यानंतर आरोपींनी ज्ञानेश्वरला फोन करून त्याच्या पत्नीविषयी संशयास्पद माहिती सांगितली. ज्ञानेश्वरही पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला.

अखेर मानसिक त्रास सहन न झाल्याने ज्ञानेश्वरने मोशी येथील राहत्या घरात 29 जुलै रोजी लोखंडी अॅंगलला पत्नीच्या साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला अकस्मात मृत्युची नोंद केली होती. मात्र, ज्ञानेश्वरच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button