breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मावळ लोकसभा निवडणूक ; पक्षाने आदेश दिल्यास निवडणुक लढणार – पार्थ पवार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – मावळ लोकसभा मतदार संघात पक्षाने आदेश दिल्यास आपण निवडणूक लढविण्यास तयार आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार पार्थ पवार यांनी स्पष्ट केले.

कामशेत येथील एका कार्यक्रमावरून जाताना पार्थ पवार यांनी आज (रविवारी) तळेगाव दाभाडे येथे सदिच्छा भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या निवास्थानी पत्रकारांनी पवार यांच्याशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत आई सुनेत्रा पवार, पुण्याचे नगरसेवक बाबूराव चांदेरे, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, जिल्हा अध्यक्ष जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्चना घारे, तालुका कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, शहराध्यक्ष गणेश काकडे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव भेगडे, महिला शहराध्यक्ष सुनीता काळोखे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, कार्याध्यक्ष संतोष मोरे, तालुकाध्यक्ष सुनील दाभाडे, नगरसेवक संतोष हेगडे, वैशाली दाभाडे आदि उपस्थित होते.

पार्थ पवार म्हणाले की, उमेदवारी अगर तत्सम विषय माझ्या डोक्यात नाही. अजून तसे काहीही ठरलेले नाही, नंतर बोलू.. मला आज तसं काही बोलायचं नाही. येथील विविध अडचणी प्रश्न समजून घेऊन त्यांचा प्रथम अभ्यास करायचा आहे. निवडणुकीबाबत दोन वर्षानंतर बघू असे सांगत त्यांनी विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांच्या आग्रही भूमिकेमुळे इथपर्यंत आलो आहे. निवडणुकीपेक्षा येथील प्रश्न काय आहेत ते समजून घ्यायचे आहेत. आपण पक्ष आदेशानुसार काम करणार आहोत. असा सावध पवित्रा त्यांनी घेतला. निवडणूक लढाईची मला घाई नाही. मात्र पक्षाने निर्णय घेतल्यास आपण निवडणूक लढविण्यास तयार आहोत असेही त्यांनी मान्य केले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारखे काम करण्याचा माझा प्रयत्न राहील असेही ते म्हणाले. यावेळी बबनराव भेगडे, संतोष हेगडे यांनी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांचे स्वागत केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button