breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कुदळवाडीत दोन दिवसीय हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – कुदळवाडी स्पोर्ट क्लबच्या वतीने आयोजित भव्य डे-नाईट ऑल इंडिया हॉलीबॉल स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी (दि. 15) झाले. प्रमुख उपस्थिती मध्ये आमदार महेश लांडगे, महापौर राहूल जाधव, माजी महापौर आझम पानसरे, माजी आमदार विलास लांडे, पक्षनेते एकनाथ पवार, लोकपंचायत समिती शिरूरचे अध्यक्ष राजेंद्र जासूद, टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव, युवा नेते पप्पू जासूद होते. असंघटीत कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दारकोंडे, सदाफुले, पुणे जिल्हा अध्यक्षा मिना मोहिते, उपाध्यक्षा जयश्री प्रसाद आदी उपस्थित होते.

कुदळवाडी येथे एसार पेट्रोल पंपासमोरील किंग काटा जवळ मोकळ्या मैदानात या स्पर्धा पार पडल्या. बुधवारी (दि. 16) स्पर्धेचा समारोप झाला. स्पर्धेतील विजयी खेळाडुंना चषक आणि बक्षिस वितरण करण्यात आले, अशी माहिती राष्ट्रवादी असंघटीत कामगारच्या पुणे जिल्हा अध्यक्षा मिना मोहिते यांनी सांगितली. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button