ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

मायनस 3 डिग्री तापमानात शुटिंग करतायेत बिग बी; ट्वीट करत सांगितला अनुभव

मुंबई | महाईन्यूज |

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या दिवसांत हिमाचलमध्ये आपला आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’च्या शुटिंगमध्ये बीझी आहेत. सुपरस्टार अमिताभ बच्चन सध्या मायनस 3 डिग्री तापमानात हिमाचलमध्ये शुटिंग करत आहेत. याच कारणामुळे हिमाचलमध्ये वाढत्या थंडीमुळे अमिताभ बच्चनने एक ट्वीट केलं आहे.

ट्वीटमध्ये अमिताभ यांनी लिहिलं आहे की, ‘येती येती येती, ये सर्दी सर पे बीती तन ढका , अंग ढका , ढका पूर्ण शरीर मन को ढकने से बाज रहे , यही है तकरीर’

अमिताभ बच्चन आगामी काळात तब्बल चार चित्रपटांसह बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांच्या यादीत, ‘चेहरे’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘झुंड’ आणि ‘गुलाबो-सिताबो’ या चित्रपटांचा समावेश आहे. ‘चेहरे’मध्ये अमिताभ बच्चन इमरान हाशमीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

‘ब्रह्मास्त्र’मध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सुपरस्टार अमिताभ यांच्यासोबत दिसणार आहेत.त्यानंतर ते गुलाबो-सिताबोमध्ये या चित्रपटामध्ये आयुष्मान खुरानसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अमिताभ बच्चन नेहमीच सोशल मिडियावर एक्टीव्ह असतात .ते अनेक गोष्टी किंवा त्यांचे अनुभव नेहमीच आपल्या फॅन्ससोबत शेअर करत असतात.

दरम्यान, बिग बी सध्या ‘ब्रह्मास्त्र’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपला एक क्लासी फोटो शेअर करत फॅन्सना सांगितले होते की, ते मनालीमध्ये असून क्लायमॅक्स शुटिंग करत आहेत. बिग बींसोबत रणबीर कपूर आणि आलिया भट्टही उपस्थित आहेत. अमिताभ बच्चान यांनी शेअर केलेल्या फोटोवर त्यांची मुलगी श्वेता नंदा हिने एका स्माइलीसोबत ‘डॅडी कूल’ अशी कमेंट केली आहे. तर फॅन्सनी त्यांच्या फोटोवर काळजी घेण्यास सांगितले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button