TOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबई

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे शेखर काटे यांनी जपली ‘सामाजिक बांधिलकी’

शालेय मुलांना साहित्य भेट: वाढदिवस विधायक पद्धतीने केला साजरा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेखर काटे यांनी यावर्षी वाढदिवस अनावश्यक खर्च न करता विधायक पद्धतीने साजरा केला. शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य भेट देण्यात आले. या उपक्रमाचे सामाजिक क्षेत्रात कौतूक होत आहे.

दापोडी येथील जनता शिक्षण संस्थेला माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्याहस्ते एलईडी टीव्ही, लॅपटॉप, झेरॉक्स मशीन सपूर्द करण्यात आले.
यावेळी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जगताप, उपाध्यक्ष रमेश कार्ले, कार्याध्यक्ष महेशकुमार आगम, जनरल सेक्रेटरी सुभाष जावळे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर, काळुराम कवितके, निखील घाडगे तसेच संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुटुंबाकडून मिळासा सामजिक वारसा…
शेखर काटे म्हणाले की, राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कुटुंबात जन्म घेतला. त्यामुळे सामाजिक दायित्वाचा वारसा आपोआप खांद्यावर आला. प्रत्येक वर्षी होणारा वाढदिवस आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी या संस्मरणीय असतातच. पण यावेळी आणखी विधायक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प होता. कुटुंबाकडून मिळालेल्या सामाजिक बांधिलकीच्या संस्कारातून अनावश्यक खर्च न करता वाढदिवस साजरा केल्याचे समाधान वाटते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button